Pune Crime News | पुणे: अश्लिल हावभाव करुन महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; जाब विचारणार्‍या पतीला शिवीगाळ करुन दिली धमकी

Molestation-Case

पुणे : Pune Crime News | जाता येता महिलेचा पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लिल हावभाव करुन अश्लिल काँमेंट करुन तिचा विनयभंग (Molestation Case) करणार्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तिच्या पतीने जाब विचारल्यावर त्याला शिवीगाळ करुन धमकाविले. (Pune Crime News)

विक्रम सलुजा (रा. उंड्री, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम सलुजा हा रिचमंड बिल्डिंगमध्ये रहात आहे. फिर्यादी या कामानिमित्त बाहेर जात असताना तो त्यांचा पाठलाग करत असे. अश्लिल नजरेने पाहून त्यांच्यावर अश्लिल कॉमेंट पास करत असे. ९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी या रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये आल्या असताना विक्रम सलुजा हा पाठलाग करत तेथे आला.

त्यावेळी फिर्यादीच्या पतीने जाब विचारल्यावर त्याने बाहेर ये तुला दाखवतो,
असे म्हणून शिवीगाळ करुन निघून गेला. त्यांना गाडी काढता येऊ नये,
म्हणून इतरांना बोलावून त्यांच्या गाड्या फिर्यादीच्या गाडीच्या पुढे लावायला सांगत.
शुक्रवारी सकाळी विक्रम सलुजा त्यांच्या इमारतीच्या इंट्री पॉईटवर थांबला होता.

फिर्यादीच्या पतीने विचारले असता त्यांच्या दिशेने थुंकला. तुला जे काय उखडायचे आहे ते उखड.
बाहर ये तुझ्याकडे पाहतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे (Amit Shete) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक

You may have missed