Pune Crime News | पुणे : घरफोडी वाहनचोरी करणारी ‘बारक्या’ टोळी जेरबंद ! 4 वाहनचोरी व 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस

पुणे : Pune Crime News | वाहनचोरी आणि घरफोड्या करणार्या बारक्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे ४ आणि घरफोडीचे २ असे ६ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील १० लाख ३१ हजार ९२० रुपयांचे १२९ ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याची लगड, १ लाख ६० हजार रुपयांच्या २ किलो चांदीच्या विटा, तसेच २ लाख ४० हजार रुपयांची ४ दुचाकी वाहने असा १४ लाख ३१ हजार ९२० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pune Crime Branch News)
https://www.instagram.com/reel/DHijNDGpqdg/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
पृथ्वीराज ऊर्फ साहिल संतोष आव्हाड (वय १९, रा. गंगानगर, फुरसुंगी), आनंद उत्तरेश्वर लोंढे (वय ३४, रा. कामठे वस्ती, राजगे आळी, हडपसर गाडीतळ), आर्यन कैलास आगलावे (वय १८, रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, कात्रज), कुलदीप गणपत सोनवणे (वय १९, रा. शेवाळवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या टोळीतील अल्पवयीन मुलगा बारक्या याच्यावरुन या टोळीला बारक्या टोळी असे नाव पडले आहे. त्याच्यावर यापूर्वी मोक्का दाखल आहे. इतरही चारही गुन्हेगारांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
बंद घराची रेकी करुन ही टोळी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरी करत असत. कोथरुडमधील हॅपी कॉलनीतील बंद घर फोडून त्यांनी त्यातून ७५ हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी असा ९५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. ८ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. पाषाण येथील शिवालय सोसायटीतील नम्रता अपार्टमेंटमध्ये घरफोडी करुन या चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली होती.ही घरफोडी यांनी १४ व १५ डिसेंबर २०२४ मध्ये केली होती.
वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी युनिट ६ कडून प्रयतन सुरु असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि पोलीस हवालदार कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बारक्या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अलंकार व चतु:श्रृंगी येथील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले़ तसेच हडपसरमधील ३ आणि लोणीकंदमधील एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत़
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे. (Pune Crime News)