Pune Crime News | पुणे : ससून रुग्णालयातील आरोपीवर गोळीबार केल्याप्रकरणात मोक्यातील 3 वर्षापासून फरार गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद (Video)

Pune Crime News | Pune: Bundgarden police arrests fugitive criminal who was absconding for 3 years in Sassoon Hospital shooting case (Video)

पुणे : Pune Crime News |  येरवडा कारागृहातून उपचारासाठी ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आरोपीवर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात मोक्काअंतर्गत १२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील १२  वा आरोपी गेल्या ३ वर्षांपासून फरार होता. बंडगार्डन पोलिसांनी या फरार गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.

https://www.instagram.com/reel/DSNHjrcCSj4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे Rohit alias Tamma Suresh Dhotre (वय २६, रा. शिवांजली मित्र मंडळाजवळ, वडारवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

तुषार हणुमंत हंबीर (वय ३५, रा. गोंधळेनगर, हडपसर) याला लोणी काळभोरमधील मोक्का गुन्ह्यात येरवडा कारागृहात होते. त्याला चालता येत नसल्याने उपचारासाठी २५ ऑगस्ट २०२२ रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी मुख्यालयातील पोलीस गार्ड नेमलेले होते. त्यावेळी पाच जणांनी इन्फोसिस इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर शिरले. त्यांनी तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने वार केले. तेव्हा त्याला वाचविण्यासाठी तेथे बंदोबस्तावर उपस्थित असलेल्या पोलीस व फिर्यादीचा मेहुणा शुभम रांदड हे मध्ये पडले. तेव्हा त्यांच्या हातावर वार करुन त्यांना जखमी केले. त्यावेळी एकाने गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये बंडगार्डन पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी १२ गुन्हेगार निष्पन्न केले. त्यातील ११ आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) करवाई करण्यात आली होती. त्यातील १२ वा आरोपी रोहित धोत्रे हा तेव्हापासून फरार होता.

पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार बडे, भोकरे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन वाघोलीतील केसनंद येथून रोहित धोत्रे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त संगिता शिंदे अल्फोन्सो करत आहेत.

ही कारवाई  अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता शिंदे अल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धरीज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे.

You may have missed