Pune Crime News | पुणे : कार चालकाची मुजोरी, दुचाकीस्वार महिलेला भर चौकात मारहाण; पाषाण परिसरातील घटना
पुणे : Pune Crime News | वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन (Violation Of Traffic Rules) भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाला जाब विचारल्याच्या कारणावरून कार चालकाने दुचाकीस्वार महिले सोबत अरेरावी केली. तसेच महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case). तर कारमधील महिलेने दुचाकीस्वार महिलेला हाताने बेदम मारहाण (Marhan) करुन जखमी केले. हा प्रकार पाषाण लिंक रोडवरील (Pashan Link Road) महाबळेश्वर हॉटेल चौकात (Mahabaleshwar Hotel Chowk) शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन चारचाकी (एमएच 12 पीसी 6011) वरील चालक स्वप्नील अशोक केकरे Swapnil Ashok Kekare (वय-57) व त्याची पत्नी श्रिया स्वप्नील केकरे (वय-52 दोघे रा. कपिल अखिला सोसायटी, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(1),74, 115,352,3(5) मोटार वाहन कायदा कलम 119/177, 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या दुचाकीवरुन पाषाण लिंक रोड वरून जात होत्या. त्यावेळी आरोपी स्वप्नील केकरे हा त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवत होता. याबाबत फिर्य़ादी यांनी त्याला विचारणा केली असता त्याने फिर्य़ादी यांच्या अंगावर असलेला रेनकोट पकडून असभ्य वर्तन करुन विनयभंग केला.
तसेच नाकावर जोरात बुक्क्या मारुन फिर्य़ादी यांना जखमी केले.
त्यावेळी महिलेने आरोपीच्या कारची चावी काढून घेतली.
याचा राग आल्याने आरोपी स्वप्नील याच्या पत्नीने फिर्य़ादी यांना हाताने मारहाण केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या