Pune Crime News | पुणे : महापालिकेतील 10 कोटीचा ठेका मिळवण्यावरुन वाद, भाजप कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखले
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Ganj Peth Pune Crime News | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) मलनिस्सारण विभागातील (PMC Drainage Department) ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून (BJP Worker Threatened With Revolver In Pune) त्याला जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threats) . हा धक्कादायक प्रकार गंजपेठेत रविवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरोधात खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) अॅट्रॉसिटीसह (Atrocity Act) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरीहर (वय-36 रा. गंजपेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते Junior Engineer Ganesh Rajendra Gite (वय 37), त्याचा भाऊ महेश (वय 35, दोघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 3(5) सह अॅट्रॉसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निर्मल हरिहर हे भाजप कार्यकर्ता असून महापालिकेत ठेकेदार आहेत. ते रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला निघाले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ थांबले होते. त्यावेळी हरिहर यांच्या ओळखीचे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते व त्याचा भाऊ महेश गिते त्याठिकाणी आले.
गिते याने हरिहर यांच्या पोटाला पिस्टल लावले. हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
‘तू 10 कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिली,
असे हरिहर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे (Vishwajit Kaigade),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस (Santosh Khetmalas) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या