Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Sudhir Chandrakant Alias Balu Gavas

पुणे : Yerawada Pune Crime News | येरवड्यात पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराचा तिघांनी धारदार कोयत्याने सपासप वार करुन खून केला (Murder Of Criminal Who Is On Police Record). ही घटना बुधवारी (दि.17) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी घडली. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (वय-23 रा. जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे येरवडा, पुणे) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Murder In Yerawada Pune)

याप्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय-44), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय-28), रवी रामचंद्र आचार्य (वय-35 सर्व राहणार जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे, येरवडा, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत गौरी धर्मेंद्र शिंदे (वय 35 राहणार जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे येरवडा पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली होती. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरू केला.
पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर हा गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी लपून बसलेला असताना त्याला तिघांनी गाठले.
त्याच्यावर धारदार कोयत्याने डोक्यात व शरीरावर वार केले. या हल्ल्यात सुधीर गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले (API Vishal Takale) करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ