Pune Crime News | पुणे: महिन्याला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, CRPF जवानावर गुन्हा दाखल
पुणे : Aundh Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास प्रति महिना 12 हजार 500 रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) एका सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीवर (CRPF Jawan) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते जूलै 2024 या कालावधीत औंध येथील बॉडीगेट पोलीस लाईन (Bodygate Police Line) येथे घडला आहे.
याबाबत प्रदिप दिलीप भोकरे (वय-36 रा. बॉडीगेट पोलीस लाईन, औंध, पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुहास रमेश पाटील Suhas Ramesh Patil (रा. मु.पो. सुखवाडी पोस्ट ब्रम्हनाळ ता. पलूस, जि. सांगली) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुहास पाटील सीआरपीएफ मध्ये कार्य़रत असून फिर्यादी हे एका खासगी कंपनीत काम करतात. आरोपीने फिर्य़ादी यांना संपर्क साधला. त्यांच्या घरी येऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
सुहास पाटील याने त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी
दिल्यास एक लाख रुपयांना प्रति महिना साडे बारा हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले.
फिर्य़ादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून पाच लाख रुपये ऑनलाईन दिले.
पैसे दिल्यानंतर सुहास याने कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा घेतलेले पैसे परत केले नाहीत.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदिप भोकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पुढील तपास पीएसआय अंगद नेमाणे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा