Pune Crime News | पुणे : 27 वर्षीय शिक्षिकेचा इयत्ता 10 वी तील 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत ‘डर्टी पिक्चर’! शाळेच्या खोलीत विवस्त्रावस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आढळल्याने पर्दाफाश
पुणे : Pune Crime News | पुण्यातील एका शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्याला लैंगिक भुरळ घालून त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित केले. शुक्रवार (दि. 27 डिसेंबर) ही शिक्षिका आणि पीडित विद्यार्थी शाळेच्या एका खोलीत विवस्त्रावस्थेत शारीरिक संबंध करीत असताना आढळून आले. त्यानंतर, या प्रकाराचा पर्दाफाश झाला.
27 वर्षीय शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम 7, 9 (फ), 11 (६), 12, 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक, विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सध्या या शाळेमध्ये परिक्षा सुरू आहेत. शुक्रवारी (27 डिसेंबर) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक शिक्षक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर गेले होते. त्यांनी एक खोली बंद असल्याचे पाहिले. त्यांनी या खोलीचा दरवाजा उघडला असता 10 वी मध्ये शिकणारा 17 वर्षांचा एक विद्यार्थी आणि शाळेतील एक महिला शिक्षिका हे दोघेही विवस्त्र अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू होते. त्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
हे दृश्य पाहताच त्यांनी मुख्याध्यपिकेला हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने खात्री करण्यासाठी CCTV फुटेज तपासले.
तेव्हा, हे दोघेही खोलीमध्ये जात असल्याचे दिसले. मुख्याध्यापिकेने याविषयी संबंधित शिक्षिकेकडे आणि विद्यार्थ्याकडे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी केली.
संबंधित महिला शिक्षिका आणि विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली. या दोघांनी एकमेकांबाबत आकर्षण असल्याचे सांगितले.
या मुलाच्या घरी एकदा ही शिक्षिका गेलेली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत