Pune Crime News | पुणे : घर खरेदीची कागदपत्रे न दिल्याने वृद्ध पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने मारुन केले जखमी; दारुच्या नशेत घरातील चुलीच्या लाकडांना दिली आग लावून

पुणे : Pune Crime News | घर विकू नये, म्हणून घरखरेदीची कागदपत्रे न दिल्याने दारुच्या नशेत वृद्ध पतीने पत्नीच्या डोक्यात काठी मारुन तिला जखमी केले. चुलीसाठी जमा केलेली घरातील लाकडे पेटवून दिली़ शेजारच्या लोकांनी ही आग विझविल्याने अनर्थ टळला.
याबाबत इंदुबाई विलास गायकवाड (वय ५०, रा. ओटा स्किम, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विलास महादेव गायकवाड (वय ६५, रा. ओटा स्किम, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांचे पती दोन मुले, नात यांच्यासह एकत्रित रहातात. विलास गायकवाड हे महापालिकेत महावितरण मध्ये कामाला होते. ते निवृत्त झाले असून त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु पिऊन येऊन घरी शिवीगाळ करतात़ १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता विलास हा दारु पिऊन घरी आला. रहाते घर विकण्यासाठी त्यांच्याकडे घराची कागदपत्रे मागू लागला. फिर्यादी यांना घर विकायचे नसल्याने त्यांनी घरखरेदीची कागदपत्रे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने जवळच पडलेली लाकडी काठी घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारली. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. तेव्हा त्यांची नात प्रियंका त्यांना घेऊन पोलीस चौकीत आली. पोलिसांनी उपचारासाठी यादी दिली. तोपर्यंत विलास गायकवाड याने दारुच्या नशेत घरातील चुल पेटविण्यासाठी जमा करुन ठेवलेल्या लाकडांना आग लावली. त्यामुळे त्या पुन्हा घरी धावत आल्या. तोपर्यंत लोकांनी आग विझवली होती. पोलिसांकडे तक्रार दिल्यास पतीची पेन्शन बंद होईल, या भितीने त्यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.