Pune Crime News | पुणे : वृत्तपत्रात कर्ज देण्याची जाहिरात देऊन फसवणूक, सिंहगड रोड परिसरातील प्रकार

fraud

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | सध्या कर्ज पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय झटपट लोन देणारे अनेक अॅप देखील आहेत. तर काही जण वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन कर्ज देतात. मात्र, वृत्तपत्रामधून किंवा लोन अॅपवरुन फसवणूक करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत (Cheating Fraud Case). अशीच एक घटना सिंहगड रोड परिसरात घडली आहे. एका व्यक्तीने वृत्तपत्रातील जाहिरात पाहून कर्जाची मागणी केली. मात्र, कर्ज न देता वेगवेगळी कारणे सांगून सव्वा दोन लाखांची फसवणूक केली. (Lure Of Loan Amount)

याबाबत सुशांत श्रीकृष्ण मोडक (वय-43 रा. रुद्र हौसिंग सोसायटी, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुरज राम गुरव Suraj Ram Gurav (रा. एकता रेसिडेन्सी, कोंढवा) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 एप्रिल 2023 ते 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत फिर्यादी यांच्या घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मुळ गावी शेतात विहीर पाडायची होती. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती. फिर्यादी यांनी 27 एप्रिल रोजी एका वृत्तपत्रामध्ये लोन संदर्भात जाहिरात पाहिली. त्यांनी जाहिरात पाहून आरोपी सुरज गुरव याला संपर्क साधला. त्याने लोन देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी यांच्याकडून इन्शुरन्स तसेच प्रोसेसिंग फी करता 2 लाख 35 हजार 800 रुपये ऑनलाईन घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे कर्जाबाबत पाठपुरावा केला. मात्र, सुरज गुरव याने फिर्यादी यांना विहीर पाडण्यासाठी कर्ज न देता तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.टी. मालुसरे करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed