Pune Crime News | पुणे : फ्लॅटचा ताबा वेळेत न देता 3 कोटींची फसवणूक, चार बिल्डरवर ‘मोफा’

fraud

पुणे : Koregaon Park Pune Crime News | फ्लॅटचा ताबा वेळेत न देता तसेच परस्पर फायनान्सकडे तारण ठेवून तीन कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्या प्रकरणी चार बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 ऑगस्ट 2014 ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत कोरेगाव पार्क येथील मार्वल बसिलो या गृहप्रकल्पात घडला आहे. (FIR On Builder In Pune)

याबाबत सनी फ्रान्सीस जेकब (वय-79 रा. हर्म्स पार्क, बंडगार्डन रोड, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्वल बसिलो प्रकल्पाचे प्रमोटर्स Marvel Basilo Project Promoters (जमीन मालक व डेव्हलपर) विजय वासुदेव वाधवा Vijay Vasudev Wadhwa (रा. प्लाटीना, जी ब्लॉक, बीकेसी बांद्रा, मुंबई), संजय राजकुमार छाब्रिया (Sanjay Rajkumar Chhabriaa), नवीन अमरलाल मखिजा (Naveen Amarlal Makhija), विश्वजीत सुभाष झवर Vishwajit Subhash Zawar (रा. ज्वेल्स टॉवर्स, लेन नं. 5 कोरेगाव पार्क) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4), 3(5) सह महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र शाम आसनानी व त्यांच्या मुलीने आरोपींच्या मार्वल बसिलो गृहप्रकल्पात फ्लॅट बुक केला होता. आसनानी व त्यांच्या मुलीने प्लॅटसह दोन कार पार्कींग विकत घेतले होते. त्यासाठी 3 कोटी 19 लाख 25 हजार 500 रुपयांचा व्यवहार ठरला होता. ठरलेल्या रक्कमेपैकी आसनानी यांनी 2 कोटी 99 लाख 35 हजार 719 रुपये आरटीजीएस तसेच चेक द्वारे प्रकल्पाचे प्रमोटर्स यांना दिले. आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ही रक्कम घेतली. आरोपींनी मुदतीत फ्लॅट देण्याचे आश्वासन दिल्याने आसनानी यांनी फ्लॅट खरेदी केला होता. (Pune Crime News)

प्रमोटर्स यांनी हा प्रकल्प मुदतीत पुर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, मुदतीत प्रकल्प पुर्ण केला नाही तर वार्षीक 9 टक्के दराने नुकसान भरपाई देण्याचे ठरले होते.
मात्र, आरोपींनी मुदतीत प्रकल्प पुर्ण केला नाही. तसेच ठरल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही.
याशिवाय शाम आसनानी व त्यांच्या मुलीच्या संमतीशिवाय फायनान्स कंपनीला फ्लॅट मॉरगेज करुन दिला.
तसेच आसनानी यांनी दिलेल्या पैशांचा हिशोब न देता मार्वल बसिलो प्रकल्पाचे प्रमोटर्स यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed