Pune Crime News | पुणे : व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने 30 लाखांची फसवणूक, लोहगाव परिसरातील प्रकार; गुन्हा दाखल

Pune Crime News | Builder duped of Rs. 4.5 crore; Flats sold to each other after completing construction in Tara Dion project

पुणे : Lohegaon Pune Crime News | स्पोर्ट्स मटेरियल शॉप मध्ये प्रॉफिट शेअरिंग भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवून 30 लाखांची फसवणूक करण्यात आली (Cheating Fraud Case). याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) लोहगाव येथील एका व्यावसायिकाविरुद्ध सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 3 जुलै 2024 या कालावधीत स्मॅशर्स अरेना स्पोर्टस अॅकेडमी येथे घडला आहे.

याबाबत कस्तूरी गोकूल आनंद राऊत (वय-40 रा. लेन नं. 3 पुजालिया अपार्टमेंट, साठे वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी बुधवारी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनुज कुमार बाबूराम Anuj Kumar Baburam (वय-47 रा. रेव्हिल ऑर्चिड, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लोहगाव येथील डी.वाय. पाटील कॉलेज रोडवर स्मॅशर्स अरेना स्पोर्टस या नावाचे दुकान आहे. आरोपीने फिर्यादी यांना स्मॅशर्स अरेना या नावाने बॅडमिंटन कोर्ट, कॅफे, योगा स्टुडीओ व स्पोर्टस मटेरियल शॉप असा व्यवसाय सुरु करणार असल्याचे सांगितले.
या व्यवसायात प्रॉफिट शेअरींग भागीदार करुन घेण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले.
अनुज यांच्यावर विश्वास ठेवून कस्तूरी राऊत यांनी व्यावसायाकरीता 30 लाख 28 हजार 308 रुपये दिले.
पैसे घेतल्यानंतर अनुज याने फिर्यादी यांना व्यवसायात भागीदार करुन घेतले नाही.
तसेच कोणतेही कागदपत्रे, हिशोब न देता, कोणताही नफा न देता फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केला.
आरोपीने स्मॅशर्स अरेना स्पोर्टस् अॅकेडमी स्वत:च्या ताब्यात ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed