Pune Crime News | पुणे: फ्लॅट व दुकानाची परस्पर विक्री करुन 70 लाखांची फसवणूक, आंबेगाव परिसरातील प्रकार
पुणे : Ambegaon Pune Crime News | विक्री केलेल्या फ्लॅट आणि दुकानाचे दुबार खरेदीखत करुन त्याची विक्री करुन एका व्यक्तीची 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). हा प्रकार एप्रिल 2016 ते जुलै 2024 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथील पार्थ दर्शन फेज 1 येथे घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) वकीलासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रमेशलाल भगवानदास गांधी (वय-68 रा. वस्तूनगर सोसायटी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश शिवाजी पिलाणे Satish Shivaji Pilane (रा. पार्थ दर्शन, आंबेगाव बुद्रुक), अॅड. नरेंद्र राजाराम कणसे
Adv. Narendra Rajaram Kanse (रा. समर्थ कृपा, आंबेगाव बुद्रुक) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गांधी यांनी आंबेगाव बुद्रुक येथील पाथ दर्शन गृहप्रकल्पाच्या फेज -1 मध्ये तीन फ्लॅट आणि एक दुकान एप्रिल 2016 मध्ये खरेदी केले होते. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या परस्पर फ्लॅट व दुकानाचे बनावट कागदपत्र तयार केली. त्या कागदपत्राच्या आधारे फिर्यादी यांचे तीन फ्लॅट व दुकान गोपीनाथ तळेकर व शोभा तळेकर, मावाराम पटेल, माधुरी शिर्के व विजय शिर्के, निलेश देशमुख हेमा देशमुख यांना दुबार खरेदीखत करुन विक्री केली. आरोपींनी फिर्यादी गांधी यांची 70 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अॅपच्या माध्यमातून 10 लाखांची फसवणूक
वारजे : नो ब्रोकर अॅपच्या माध्यमातून फ्लॅट शोधणाऱ्या एका व्यक्तीला दहा लाख 18 हजार 599 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 26 ऑक्टोबर 2023 रोजी ऑनलाइन घडला आहे. याबाबत मैत्रेय मंगेश पेठे (वय-32 रा. कर्वे नगर, कोथरुड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश राठोड, कुनाल अग्रवाल यांच्यावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी राहण्यासाठी फ्लॅट शोधत होते.
नो ब्रोकर अॅपवरुन घर शोधत असताना आरोपींनी पेठे यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना सोसायटी गेट पास जनरेट करण्यास सांगून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले.
पैसे दिल्यानंतर फ्लॅट व दिलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक