Pune Crime News | पुणे: परप्रांतियाकडून कॅब चालकाची फसवणूक, गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Swargate Pune Crime News | कॅब बुक करुन कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर व गोवा असे फिरून आल्यानंतर कॅब चालकाचे पैसे न देता फसवणूक केली (Cheating Fraud Case). तसेच आरोपीने कॅब चालकाला हॉटेलचे बिल देण्यास भाग पाडले. हा प्रकार 29 मे ते 4 जून या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील व्यक्तीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतिश नामदेव नाईक (वय-36 रा. विठ्ठलकुंज, अंबेडकर भवन समोर, किरकटवाडी, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप अशोक झोड Sandeep Ashok Zod (वय-35 रा. अन्नपुर्णा नगर, इंदौर, मध्यप्रदेश) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कॅब चालक असून 29 मे रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी संदीप झोड यांनी कॅब बुक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला स्वारगेट परिसरातील जेधे चौकातील नटराज हॉटेल येथून गाडीत बसवले. आरोपीने कराड, सातारा, सांगली, कोल्हापुर व गोवा असा कॅबने प्रवास केला. प्रवास संपल्यानंतर कॅबचे भाडे देतो असे सांगून संदीप याने कॅब चालक सतिश यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर कराड येथील सत्यजीत हॉटेलचे बील फिर्यादी यांना भरण्यास सांगितले. पुण्यात आल्यानंतर सतिश यांनी आरोपी संदीप याच्याकडे भाड्याचे 21 हजार 380 आणि हॉटेलचे भाडे 20 हजार असे एकूण 41 हजार 380 रुपयांची मागणी केली. मात्र, आरोपीने फिर्यादी यांना अद्यापपर्य़ंत पैसे न देता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सतिश नाईक यांनी रविवारी (दि.14 जुलै) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

बँक खात्याची चौकशीच्या बहाण्याने फसवणूक

हडपसर : मनी लॉड्रींगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले आहे,
असे सांगून एका व्यक्तीची सहा लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार 23 जुलै रोजी ऑनलाईन घडला आहे.
याबाबत साडेसतरा नळी (Sade Satra Nali) परिसरात राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने
हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed