Pune Crime News | पुणे: परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, तिघांवर FIR
पुणे : Pune Crime News | युनायटेड किंगडम (UK) येथील हॉटेलमध्ये मॅनेजर पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून (Lure Of JOB In UK) पुण्यातील एका तरुणाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) मुंबई, गोवा आणि युके मधील व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 एप्रिल 2022 ते 4 जून 2024 या कालावधीत युनियन बँकेच्या कॅम्प शाखेत, गोवा, लंडन येथे घडला आहे.
याबाबत रुएल ज्युएल चिनान (वय-27 रा. सिंड्रेला अपार्टमेंट, साचापीर रोड, कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेरी डिकोस्टा (रा. पिस लिलीज बिल्डिंग, गोवा), जेनेट नेव्हिस वाझ (रा. सी विंग, शालीनी सदन, बोरीवली वेस्ट, मुंबई), सुनिल डिसुजा (रा. युके) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी रुएल चिनान यांचे युके मध्ये शिक्षण झाले आहे.
आरोपी आणि फिर्य़ादी यांची नोकरीच्या अनुषंगाने ओळख झाली होती.
आरोपींनी फिर्य़ादी यांना 9 लाखात युके येथे वर्क व्हिझा व हॉटेलमध्ये मॅनेजर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
आरोपींनी युनियन बँकेच्या कॅम्प शाखेतील फिर्यादी यांच्या आईच्या खात्यातून तसेच फिर्यादी यांच्या युके मधील रोव्होलेट बँकेच्या खात्यातून सहा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना वर्क व्हिझा व हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवून न देता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा