Pune Crime News | पुणे : 100 हुन अधिक महिला, अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्याच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

rape case (1)

पुणे : Pune Crime News | चांगल्या कंपनीत नोकरी असलेल्या परंतु, महिला, अल्पवयीन मुलींचे पाठीमागून फोटो काढून ते सोशल मीडिया प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये आणि सोशल मीडिया पोलिसांनी तपासल्यावर त्यांचा धक्का बसला. त्याने 100 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याचे आढळून आले आहे.

किसन हनुमंत तोरडमल Kisan Hanumant Toradmal (वय २७, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन तोरडमल हा हडपसरमधील एका कंपनीत नोकरीला आहे. गेले जवळपास १ वर्षांपासून तो महिला, तरुणी यांचे पाठमोरे व्हिडिओ, फोटो काढून ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकत असतो. त्याखाली तो अश्लिल कमेंट करतो. याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेला व आणखी एका तरुणीला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सुचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार अविनाश् गोसावी, महावीर लोंढे यांनी तांत्रिक तपास करुन किसन तोरडमल याचे नाव निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचे सोशल मीडियावरील अकाऊंट, मोबाईल याची तपासणी केल्यावर तो गेल्या वर्षभरापासून असे विकृत उद्योग करीत असल्याचे आढळून आले. तो रस्त्याने जाणार्‍या, वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेल्या महिलांचे पाठी मागून विकृत व्हिडिओ काढतो. अशा १०० हून अधिक महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट आणि मोबाईलमध्ये आढळून आले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, महावीर लोंढे, प्रकाश सावंत, सुनील आव्हाड यांनी केली आहे.

You may have missed