Pune Crime News | पुणे : पिस्टल बाळगणार्या गुंडाला लक्ष्मीनगर पोलिसांनी सापळा रचून केले अटक; गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त
पुणे : Pune Crime News | येरवड्यातील आंबेडकर चौक परिसरात गावठी पिस्टल घेऊन थांबलेल्या गुंडाला लक्ष्मीनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
कुलतारसिंग नानकसिंग बावरी Kultarsingh Nanaksingh Bawari (वय २३, रा. पोते वस्ती, मागीरबाबा मंदिराजवळ, अशोकनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इंद्रप्रस्थ उद्यान गेट, आंबेडकर चौक रस्ता येथे एका जणाकडे पिस्टल असून तो कोणाची तरी वाट पहात थांबला आहे. या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, सावंत, पोलीस अंमलदार कांबळे, गायकवाड, जाधव, प्रदिप चव्हाण, शिंदे, गद्दे, पोलीस हवालदार अडकमोड हे त्या ठिकाणी पोहचले. त्यांना फुटपाथवर एक जण कोणाची तरी वाट पहात थांबल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो कावरा बावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करुन लागला. तेव्हा पोलिसांनी कुलतारसिंग बावरी याला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम व त्यांच्या सहकार्यांनी केली.
