Pune Crime News | पुणे: सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देण्याचे आमिष, ज्येष्ठाची 20 लाखांची फसवणूक

Fraud

पुणे : Kothrud Pune Crime News | सोने खरेदी-विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष (Lure Of Profit) दाखवून 20 लाखांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार कोथरुड येथे ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एरंडवणे येथे राहणाऱ्या 64 वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि.16) अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार मयुर फडके (रा. बंधुप्रेम सोसायटी, कर्वेनगर) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर व फिर्यादी यांची ऑक्टोबर 2023 मध्ये ओळख झाली. त्यावेळी मयुर याने सोने-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले.

सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना सोने खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मयुर याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपीला 20 लाख रुपये रोख स्वरुपात दिले. पैसे घेतल्यानंतर मयुर फडके याने फिर्यादी यांना नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

क्रिप्टो करन्सी मध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

वानवडी : क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) मध्ये जास्त नफा मिळवून देतो
असे सांगून वानवडी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीची 18 लाख 42 हजार रुपयांची
ऑनलाइन आर्थिक फसवणूक (Online Cheating Fraud Case) केली आहे.
याप्रकरणी अदुरी सामा शर्मा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi)
आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 5 मार्च ते 28 जून या कालावधीत घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed