Pune Crime News | पुणे: हायब्रीड पॉवर पॅक प्रोडक्ट उत्पादनातून फायदा करुन देण्याचे आमिष, डॉक्टरची 10 कोटींची फसवणूक
पुणे : Pune Crime News | हायब्रीड पॉवर पॅक (Hybrid Power Pack) उत्पादनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल असे आमिष दाखवून (Lure Of Profit) एका 65 वर्षीय डॉक्टरला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही नफा न देता 10 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 एप्रिल2018 ते 17 जुलै 2024 या कालावधीत तक्रारदार यांच्या राहत्या घरी घडला आहे.
याबाबत डॉ. सुहास दामोदर साठे (वय-65 रा. नयनतारा, भंडारकर रोड, पुणे) यांनी बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार, हेमंत करमचंद रोहेरा (Hemant Karamchand Rohera), पिंकी हेमंत रोहेरा Pinky Hemant Rohera (दोघे रा. फ्लेमिंगो रहेजा गार्डन, वानवडी – Wanwadi), ज्योती अमरजीत कलसी Jyoti Amarjeet Kalsi (रा. गोल्डन कॅस्केड, वाकड रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले की, कार, ट्रक, मोटार सायकल, जनरेटर यामध्ये लेड बॅटऱ्या असतात. त्याऐवजी हायब्रीड पॉर पॅक (एच.पी.पी) बॅटरीचा वापर करता येऊ शकतो. तसेच याच्या उत्पानासाठी येणारा खर्च लीड बॅटरीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी आहे. हायब्रीड पॉवर पॅक प्रोडक्टच्या तंत्रज्ञानाच्या उत्पादनासाठी तांत्रिक ज्ञान व लेड स्मॅल्टींग प्लॅन्ट सुरु करणार आहोत. तसेच ऑर्डर देखील आल्याचे फिर्यादी यांना भासवले.
एच.पी.पी. बॅटरी प्रोजेक्टची वेगवेगळ्या मल्टी नॅशनल कंपन्यांनी तपासणी केली असून या कंपन्या प्रोडक्टचे उत्पादन करण्यास व खरेदी करण्यास तयार असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल असे आमिष फिर्य़ादी यांना दाखवले. प्रकल्प सुरु करण्यासाठी किमान 8 कोटी 63 लाख रुपयांची गरज असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांनी पैसे गुंतवण्यास तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्या समजुतीचा करार (एमओयू करार) झाला.
त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यात 10 कोटी रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना बॅटरी प्रोडक्ट तसेच गुंतवलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
याबाबत फिर्य़ादी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता.
त्यानुसार अर्जाची चौकशी करुन बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन