Pune Crime News | पुणे : चंदननगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २५ लाखांचे मेफेड्रोन जप्त; सराईत गुन्हेगार अटकेत

Pune Crime News | Pune: Major action by Crime Branch in Chandannagar; Mephedrone worth 25 lakhs seized; Innkeeper arrested

पुणे: Pune Crime News |  गुन्हे शाखेने चंदननगर परिसरात अमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रोन (एमडी) विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे १२० ग्रॅम मेफेड्रोन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रतननाथ मोहननाथ योगी Ratannath Mohannath Yogi (वय ४२, रा. सोपाननगर, वडगावशेरी) असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. वडगावशेरी रस्त्यावरील सोपाननगर भागात, एका आइस्क्रीम फॅक्टरीजवळील फार्महाऊसमध्ये आरोपी मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार संदीप देवकाते यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

झडती दरम्यान आरोपीकडून मेफेड्रोन अमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाईल फोन आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे आणि शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.