Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | लिव्ह-इनमध्ये रहात असताना तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारल्यावर तिला नकार देऊन मारहाण करणार्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीकांत बाळासाहेब शिंदे Shrikant Balasaheb Shinde (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत एका २५ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ एप्रिल २०२४ पासून ३ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि श्रीकांत शिंदे हे दोघे एकाच ठिकाणी कामाला आहेत. दोघेही चंदननगरमध्ये लिव्ह-इनमध्ये राहतात. श्रीकांत शिंदे याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लोणीकंदमधील एका लॉजमध्ये शारीरीक संबंध ठेवले.
