Pune Crime News | पुणे : २ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या ठेकेदाराचा खुन:संशयिताला जबलपूरहून घेतले ताब्यात

Vittal Polekar

पुणे : Pune Crime News | सिंहगड पायथ्यापासून (Sinhagad Fort) अपहरण झालेल्या (Kidnapping Case) नामांकित व्यावसायिकाचे गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आले होते. २ कोटी रुपये किंवा जग्वार गाडी देण्याची मागणी करण्यात आली होती. खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) बॅक वॉटरमधील ओसाडे गावाच्या हद्दीत छिन्नविछिन्न अवस्थेत पोळेकर यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे़ . विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा) असे या शासकीय ठेकेदाराचे नाव आहे. (Murder Case)

दरम्यान, जबलपूरहून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितलेल्या माहितीवरुन पोलिसांना खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमधील ओसाडे गावाच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला असून तो विठ्ठल पोळेकर यांचाच आहे का याची अद्याप खात्री करण्यात आली नसल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांनी सांगितले.

विठ्ठल पोळेकर हे शासकीय ठेकेदार असून त्यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. विठ्ठल पोळेकर हे नेहमीप्रमाणे १४ नोव्हेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी पहाटे साडेपाच वाजता घरातून बाहेर पडले. दररोज लवकर घरी येणारे पोळेकर सकाळचे दहा वाजले तरी परत न आल्याने घरातील लोकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.

याबाबत त्यांची मुलगी सोनाली विठ्ठल पोळेकर यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (रा. डोणजे, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विठ्ठल पोळेकर यांना व त्यांचा मुलगा प्रशांत यांना योगेश भामे याने दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करु देण्यासाठी जग्वार गाडीची मागणी केली होती. ती त्यास न दिल्याने त्याने प्रशांत पोळेकर यांच्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ती न मिळाल्याने योगेश भामे व त्याच्या बी बी बॉईज टोळीतील साथीदारांनी विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यादृष्टीने पौड, लोणावळा परिसरातील हॉटेल, लॉजेस तपासण्यात येत होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महिला बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध प्रश्नांवर उठवला आवाज

You may have missed