Pune Crime News | पुणे : नामांकित कंपनीच्या अॅपवरुन कंबरेचा बेल्ट मागवणं पडलं महागात, 206 रुपयांचा बेल्ट पडला एक लाखाला
पुणे : Pune Crime News | सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची गरज पडत नाही. मोबाईलवरुन वस्तू मागवून घेतल्या जाऊ शकतात. तसेच ती वस्तू परत करुन पैसे परत घेतले जाऊ शकतात. मात्र, एका ज्येष्ठ नागरिकाने एका नामांकित कंपनीच्या अॅपवरुन ऑनलाईन कंबरेचा बेल्ट मागवणे चांगलेच महागात पडले आहे. कोंढवा परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची 1 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Online Cheating Fraud Case)
याबाबत भाग्योदयनगर (Bhagyoday Nagar Kondhwa) परिसरात राहणाऱ्या एका 64 वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि.10) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 17 फेब्रुवारी ते 6 मार्च मे 2024 यादरम्यानच्या काळात घडला आहे. फिर्यादींनी मिशो नावाच्या कंपनीच्या अॅपवर कंबरेचा बेल्ट ऑर्डर केला होता. मात्र अॅपवर बेल्ट उपलब्ध नसल्याने फिर्यादींनी ऑर्डर रद्द केली. फिर्यादींना ऑर्डरचे रिफंड मिळाले नसल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधला. सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले.
सायबर चोरट्यांनी तुमची अडचण दूर करण्यासाठी एक लिंक पाठवतो त्यावर क्लिक करुन अॅप डाऊनलोड करा असे सांगितले. फिर्यादी यांनी अॅप डाऊनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईल हॅक केला. तुमच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत तपासून बघा असे सांगून बँक खात्याची माहिती चोरली. खासगी माहितीचा वापर करुन फिर्यादींच्या बँक खात्यातून एक लाख 11 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड