Pune Crime News | पुणे : पोलिसांचा चोरट्यांवर गोळीबार, वंडरसिटी परिसरातील घटना

crime-logo

पुणे : Pune Crime News | पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामाऱ्या असे प्रकार वाढ असताना काही चोरट्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी पोलिसांनी चोरट्यांवर गोळीबार केला. हा प्रकार शहरातील नवले पुलाजवळ (Navale Bridge Pune) वंडरसिटी परिसरात (Wonder City Katraj) मध्यरात्री घडला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी (PSI Ravikant Koli) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी आणि त्याचे सहकारी रविवारी मध्यरात्री नवले पूल परिसरात गस्त घालत होते. (Pune Crime News)

त्यावेळी वंडसिटी भागात दोघेजण मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच दोघे तरुण कारमधून पळून जात होते. पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोळी यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर चोरटे नवले पुलाच्या दिशेने पसार झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?