Pune Crime News | पुणे : जीवनसाथी डॉट कॉमवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Molestation-rape

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले (Lure Of Marriage). तिला भेटण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले (Physical Relationship). तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे (Cheating Fraud Case). हा प्रकार जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत पिडीत तरुणीच्या राहत्या घरी घडला आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.3) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सुदर्शन संदिपान शिंगाटे Sudarshan Sandipan Singhate (वय-38 रा. चंद्रभागा आंगण, आंबेगाव, पुणे) याच्याविरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 417 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि आरोपी यांची जानेवारी 2024 मध्ये जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाली.

त्यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने वेळोवेळी मुलीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

हडपसर : सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) बुधवारी (दि.3 जुलै) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत संभाजी हुलवान
Abhijeet Sambhaji Hulwan (रा. पंचवटिनगर, खानापुर, सांगली) याच्यावर भान्यास 64(1), 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि फिर्य़ादी यांची सोसल मीडियावर ओळख झाली.
आरोपीने आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले.
तिला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर परिसरात भेटण्यासाठी बोलवून घेतले.
तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.
त्यावेळी त्याने मोबाईल मध्ये तरुणीसोबचे फोटो काढले.
पिडीतेने लग्नाबाबत विचारणा केली असता फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed