Pune Crime News | पुणे: सफाई कामगार महिलेशी अश्लील वर्तन, एकाला अटक; लक्ष्मीरोडवरील घटना

Pune Crime News | Pune: Notorious Criminal Who Created Terror Through Vandalism Arrested by Yerwada Police

पुणे : Laxmi Road Pune Crime News | दुकानाच्या पहिल्या मजल्यावर असलेले बाथरुम साफ करत असताना महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे (Molestation Case) . ही घटना मे 2024 मध्ये लक्ष्मी रोडवरील एका डायमंडच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत 38 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडकसिंग किर्तीसिंग बोगटी (वय-45 रा. हरका नगर, पुना कॉलेज समोर, पुणे) याच्यावर आयपीसी 354(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला सफाई कर्मचारी आहे. लक्ष्मीरोडवर असलेल्या एका डायमंड दुकानात त्या साफसफाईचे काम करतात. 29 मे रोजी महिला दुकानातील पहिल्या मजल्यावर असलेले बाथरुम साफ करत होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने मी तुझा पती आहे असे म्हणून महिलेसोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग केला. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
यातून पिडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गणेश कोकरे Ganesh Kokare (वय-25 रा. आंबेगाव बु.) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 376/3, 323, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
मुलीने त्याला विरोध केला असता तिला माराहण करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Minor Girl Rape Case)

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”