Pune Crime News | पुणे : धक्कदायक! महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, ड्रन्क अँड ड्राईव्ह कारवाई दरम्यानची घटना
पुणे : Pune Crime News | पुणे शहरात कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, गुरुवारी सायंकाळी पुण्यातील मध्यवस्तीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची (Drunk And Drive Case) कारवाई करत असताना एका मद्यपीने वाहतूक शाखेच्या (Pune Traffic Police) महिला अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune) फरासखाना वाहतूक विभागाच्या (Faraskhana Traffic Division) कार्यालयाजवळ सायंकाळी साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) एका मद्यपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Pune Crime News)
या घटनेत महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar) व पोलीस हवालदार समीर सांवत हे दोघे जखमी झाले आहेत. संजय फकिरबा साळवे (वय-32 सध्या रा. पिंपरी-चिंचवड मुळ रा. पिंपळगाव शेला, पो. जवखेडा बुद्रुक, जि. जालना) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न (Attempt To Kill), सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार समीर प्रकाश सावंत (वय-38) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येत आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांची तपासणी करुन मद्य प्राशन करुन वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जात आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात होती. त्यावेळी आरोपी दारु पिऊन गाडीवरुन जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवून त्याची तपासणी करण्यास सरुवात केली.
आरोपी मद्य प्राशन करुन वाहन चालवताना वाहतूक पोलिसांना मिळून आला.
पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत होते.
त्यावेळी त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतली.
हा प्रकार समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर त्याठिकाणी आल्या.
वाहतूक पोलिसांनी आरोपीला थांबवून ठेवले होते.
काही समजण्याच्या आताच आरोपीने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर
आणि सावंत यांच्या अंगावर टाकला. त्यानंतर त्याने लाईटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी साळवे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ (Sr PI Deepali Bhujbal) करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा