Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

fraud

पुणे : कै. न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे चॅरिटी ट्रस्टची (Ranade Charity Trust) जमीन बळकावून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्या प्रकरणी तीन जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ट्रस्टच्या मालकीच्या जमीनीचे बनावट कागदपत्र (Fake Documents) तयार करुन सातबारा उताऱ्यावर स्वत:ची नावे लावून जमीन बळकावली. हा प्रकार 2007 ते 2023 या कालावधीत सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी (Servantes of India Society) संस्थेत घडला आहे.

याबाबत ट्रस्टचे सदस्य सुनिल वामन भिडे (वय-66 रा. हार्मोनी, डेक्कन जिमखाना) यांनी बुधवारी (दि.17) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलींद भगवंत देशमुख Milind Bhagwant Deshmukh (रा. एफसी रोड, डेक्कन), सागर बाळासाहेब काळे Sagar Balasaheb Kale (रा. धनकवडी, पुणे), शिवाजी विठ्ठलराव धनकवडे Shivaji Vitthalrao Dhankawade (रा. धनकवडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 419, 420, 467,468,471, 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चॅरिटी ट्रस्टच्या मालकीची हवेली तालुक्यातील शेवाळवाडी येथे 5 हेक्टर 98 आर जमीन आहे. आरोपींनी आर्थिक फायद्याच्या उद्देशाने कट करुन या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे हवेली तहसीलदार कार्य़ालयात सादर करुन ट्रस्टच्या जमीनीचे फेरफार व सातबारा उताऱ्यावर स्वत:ची नावे लावून घेतली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन बळकावून फसवणूक केली.

हा प्रकार ट्रस्टचे सदस्य सुनील भिडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे