Pune Crime News | पुणे: महिलेवर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी, मुंढवा परिसरातील घटना

Molestation

पुणे : Mundhwa Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे (Rape Case Mundhwa Pune). हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते मार्च 2024 या कालावधीत केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) तसेच फडके हौद परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने सोमवारी (दि.8) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकीत नंद तिवारी Ankit Nand Tiwari
(वय-38 रा. पॅनासिया हाईट्स, फडके हौद, पुणे मुळ रा. टेहरी ताचेन्नारी सासारा, बिहार) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या घरी तसेच त्याच्या राहत्या घरी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने अंकीत याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. महिलेने लग्नाबाबत तगादा लावल्यानंतर अंकीत तिवारी याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. तसेच पिडित महिलेला तु जर माझी तक्रार केली किंवा मंदीरात आली तर तु मला ब्लॅकमेल करत आहे अशी तुझी पोलिसांकडे खोटी तक्रार करेन. तसेच तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

महिलेला जातीवाचक शिवीगाळ

पुणे : महिलेच्या घरासमोर येऊन तिला जातीवाचक शिवीगाळ केली.
वडिलांवर केलेली केस मागे नाही तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला आहे.
हा प्रकार 28 जून रोजी घडला असून 35 वर्षीय महिलेने
मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अमोल गणेश शेळके Amol Ganesh Shelke (वय-45 रा. वसंत बहार सोसायटी, गोखलेनगर, पुणे)
याच्यावर आयपीसी 509, 504, 506 सह अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed