Pune Crime News | पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन भावांना मारहाण, दोघांना अटक

Arrest

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | कामावारुन घरी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा तोल गेला. त्यामुळे तरुणाने त्याची दुचाकी थांबवली असता चौघांनी मिळून दोन भावांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास नऱ्हे येथील झील कॉलेज चौकातील (Zeal College Narhe) सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

याबाबत वसीम मौलाली शेख (वय-29 रा. आंबाईदरा रोड, उत्पल रेसिडन्सी, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ओंकार वसंत सुतार (वय-22 रा. बेनकरवस्ती, धायरी), साईनाथ बंडु आडे (वय-19 रा. महाराज चौक, नऱ्हे) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर दोन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांचा भाऊ मेहबुब शेख हे दोघे दुचाकीवरुन घरी जात होते. झील कॉलेज चौकातील सार्वजनिक रोडवर फिर्यादी आले असता समोरून दोन दुचाकीवरुन चारजण आले. त्यापैकी एका दुचाकीवरील तरुणाचा तोल गेल्याने दुचाकी फिर्यादी यांच्या बाजुला आली. त्यामुळे वसीम यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने गाडीवरुन उतरून काही एक कारण नसताना वसीमच्या कानशिलात लगावली. (Pune Crime News)

त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांनी वसीम याला पकडून डोक्यात दगड मारुन जखमी केले.
फिर्यादी तिथून जात असताना आरोपींनी फिर्य़ादी यांचा भाऊ मेहबुब याला दगड फेकून मारले.
यामध्ये तो देखील जखमी झाला आहे.
याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed