Pune Crime News | पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणार्या मध्य प्रदेश, नाशिक येथील टोळ्यामधील दोघे चोरटे जाळ्यात (Video)

पावणेतीन लाखांचे 21 मोबाईल हस्तगत, फरासखाना पोलिसांची कामगिरी
पुणे : Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या खिशातील मोबाईल मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असतात. अशाच मोबाईल चोरणार्या मध्य प्रदेश व नाशिक जिल्ह्यातील २ टोळ्यांमधील दोघांना फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) पकडले. त्यांच्याकडून २ लाख ७९ हजार रुपयांचे २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत दुपारपर्यंत त्यांनी २१ मोबाईल चोरले होते. (Arrest In Mobile Theft Case)
https://www.instagram.com/reel/DAGYk9BpBim/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
फैसल अजीज खान (वय २२, रा. रमाबाई नगर, मनमाड, नाशिक) आणि कालु राजू पारधी (वय २५, रा. सुहागपूर, जि. ओसंगाबाद, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
https://www.instagram.com/p/DAGVnHspNOj
खेड तालुक्यातील हर्षल अर्जुन निंबाळकर हे त्यांच्या भावासोबत बेलबाग चौकात लोखंडी बॅरिकेटजवळ थांबून विसर्जन मिरवणुक पहात होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल कोणीतरी चोरुन नेला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्याअनुषंगाने शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन जाधव यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून २ लाख ७९ हजार रुपयांचे २१ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
https://www.instagram.com/p/DAGFVuSiahF
चोरी करण्याची पद्धत
आरोपी हे गर्दीमध्ये येऊन भाविकांच्या खिशातील महागडे मोबाईल फोन चोरी करुन लगेच बाजूला निघून जात. बाजूला आल्यावर त्यातील सीम कार्ड तत्काळ फेकून देऊन मोबाईल फोन बंद करीत असत.
https://www.instagram.com/p/DAGDR1qiuFn
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार (ACP Nutan Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे (Sr PI Prashant Bhasme), पोलीस निरीक्षक अजित जाधव (PI Ajay Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde), सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, उत्तम कदम, पोलीस अंमलदार तानाजी नागंरे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, बाळासाहेब चव्हाण, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, रेखा राऊत यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAF2-YXNuhQ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा