Pune Crime News | पुणे : मामाने चाकूने भोसकून 15 वर्षाच्या भाच्याचा केला खून; नर्‍हेमधील कृष्णाईनगरीत घडली घटना

Murder

पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीत मामाने आपल्या १५ वर्षाच्या भाच्याच्या छातीत चाकूने भोसकून खून केला. ही घटना नर्‍हे येथील कृष्णाई नगरी येथे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली. (Murder Case)

गजानन गजकोश (वय १५, सध्या रा. गुलमोहम्मद चाळ, धारावी, मुंबई) असे खून झालेल्या भाच्याचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) मामा मेघनाथ अशोक तपासे (वय ४९, रा. कृष्णाईनगरी, मानाजीनगर, नर्‍हे, मुळ रा. गुलमोहम्मद चाळ, धारावी, मुंबई) याला अटक केली आहे.

याबाबत मेव्हणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय ३१, रा. कृष्णाईनगरी, मानाजीनगर, नर्‍हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन हा मुंबईतून मामाकडे राहण्यासाठी आला होता. मामाच्या मुलासोबत त्याचे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडण झाले. त्यामुळे चिडलेल्या मामा मेघनाथ याने गजानन याला प्रथम पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर घरातील चाकूने गजानन याच्या छातीत डाव्या बाजूस मारुन गंभीर जखमी केले. त्यातच गजानन याचा मृत्यु झाला. सिंहगड रोड पोलिसांनी याचा माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मामाला अटक केली आहे.

You may have missed