Pune Crime News | पुणे : रागाने का बघतो या कारणावरुन दोन गटात राडा ! पाटील इस्टेटमधील भांडणात दोन्ही गटातील 6 जणांना अटक

पुणे : Pune Crime News | मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सरबत पिण्यासाठी गेले असताना रागाने का बघतो, या कारणावरुन पाटील इस्टेटमध्ये मध्यरात्री दोन गटात राडा झाला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) दोन्ही गटातील सहा जणांना अटक केली आहे.
याबाबत प्रकाश रावसाहेब अहिवळे (वय२७, रा. पवार वस्ती, दापोडी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फरदिन अक्रम खान (वय २४, रा. पाटील इस्टेट), अरबाज शेख, अफताब पटेल (वय २३), सोहेल कुरेशी (वय २४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे. हा प्रकार पाटील इस्टेटमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश अहिवळे हे ऋषिकेश बनसोडे व सौभर पारवे यांचा वाढदिवस असल्याने पाटील इस्टेट चौात आला होता. वाढदिवस साजरा करुन मध्यरात्री साडेबारा वाजता ते गल्ली नं. १० मध्ये थंड पिण्यासाठी गेले. तेथे एक जण त्यांच्याकडे रागाने पहात होता. वाद नको म्हणून त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणाहून घेऊन गेले. काही वेळाने ते गल्ली नं. १० मध्ये आले. तेव्हा ते फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम यांना विनाकारण हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करु लागले. त्यावेळी सौरभ पारवे, ऋषिकेश बनसोडे व आशिष हे आले. त्या चौघांपैकी एकाने आशिष जाधव याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याविरोधात फरदीन अक्रम खान (वय २४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सौरभ पारवे (वय २१), शुभम चव्हाण (वय २२, रा. पाटील इस्टेट) यांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २४ मार्च रोजी मध्यरात्री जेवण करुन त्यांच्या मित्रासह चौकात आले. तेथे सौरभ पारवेचा वाढदिवस साजरा करीत होते. त्यानंतर घरी जात असताना शुभम चव्हाण म्हणाला की, तुला खूप माज आला आहे. तुझ्याकडे पहातोच म्हणून तो शिवीगाळ करु लागला. सौरभ पारवे याने धक्का देऊन खाली पाउले. शुभम चव्हाण याने फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. सौरभ पारवे याने हातातील दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या दोन साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे तपास करीत आहेत.