Pune Crime News | पुणे : पार्किंगमध्ये झाडू मारताना तोल गेला; पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, CCTV व्हिडिओ समोर

Pune Crime News | Pune: Woman loses balance while sweeping in parking lot; falls into water tank, dies tragically, CCTV video in front of her

पुणे : Pune Crime News |  पिंपरी-चिंचवडमधील डूडूळगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पार्किंगमध्ये झाडू मारत असताना तोल गेल्याने एक महिला थेट पाण्याच्या टाकीत पडली आणि त्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

https://www.instagram.com/p/DSJ0W3-iaZK

मृत महिलेचे नाव आशाबाई ढोणे (वय ४६) असे आहे. गुरुवारी सायंकाळी यशदा स्प्लेंडर पार्क सोसायटीमध्ये ही घटना घडली. टाकीला झाकण नसल्याने साफसफाईदरम्यान एक पाय आत गेल्याने त्या खाली कोसळल्या. मदतीसाठी हाक देऊनही वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

You may have missed