Pune Crime News | पुणे: महिला पोलीस कर्मचार्‍याचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; विश्रांतवाडीतील घटना

police bhai

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | चारित्र्याच्या संशयावरुन महिला पोलीस कर्मचारी (Doubts On Character Of Wife) असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. पोलीस लाईन, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजता विश्रांतवाडी येथील त्यांच्या घरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि हर्षद पानसरे यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. हर्षद एका कंपनीत कामाला आहे. विश्रांतवाडी पोलीस लाईनमध्ये (Vishrantwadi Police Line) ते राहतात. हर्षद हा फिर्यादींच्या चारित्र्याचा संशय घेऊन घाणेरडे शिवीगाळ करत. बदनामीकारक मेसेज पाठवून वाद घालत असे. शनिवारी पहाटे त्याने फिर्यादीसोबत वाद करुन त्यांना गादीवर ढकलून, मी तुझा जीवच घेतो, असे म्हणून फिर्यादीचा जोरात गळा आवळूला. त्या ओरडायला लागल्यावर एका हाताने गळा व एका हाताने तोंड दाबून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी प्रतिकार करत आपली सुटका करुन घेतली व पोलिसांशी संपर्क साधला. त्याबरोबर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हर्षद पानसरे याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

You may have missed