Pune Crime News | पुणे: बहिणीला छेडल्याच्या कारणावरुन तरुणाला रॉडने मारहाण, 8 जणांवर FIR
पुणे : Uttam Nagar Pune Crime News | बहिणीला छेडल्याच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉड आणि बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना हवेली तालुक्यात (Haveli Taluka) घडली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) दुपारी साडे चार ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान कुरण बुद्रुक गावातील म्हसोबा मंदिराजवळ घडला आहे.
याबाबत नारायण प्रताप तावरे (वय- 30 रा. मधलीवाडी, कुरण बुद्रुक, ता. वेल्हा जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर मनोहर कडू, सागर मनोहर कडू, सौरभ विठ्ठल कडू, सोमनाथ कडू, कृष्णा नानासाहेब कडू, रामदास कडू, विश्वनाथ कडू, संकेत बाळासाहेब पासलकर, मयुर अनंता कडू (सर्व रा. कुरण बुद्रुक ता. वेल्हा जि.पुणे) यांच्याविरुद्ध भान्यासं 118(1), 189(2), 190, 191(2)(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तावरे शनिवारी त्यांचे जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मयुर कडू याने तु माझ्या बहिणीला का छेडलेस असे म्हणून तावरे सोबत वाद घातला. त्याने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून धारदार हत्याराने नारायण तावरे यांना लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. तसेच मयुर कडू याने तावरे यांच्या पायावर कोयत्याने वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बहिणीच्या प्रियकराला मारहाण
कोंढवा : बहिणीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती समजल्यानंतर तिच्या प्रियकराला बोलवून घेत त्याला बॅट,
प्लास्टिक पाईप व पट्ट्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी दिली.
हा प्रकार रविवारी (दि.8) दुपारी दीडच्या सुमारास कोंढवा खुर्द येथे घडला आहे.
याप्रकरणी 35 वर्षीय युवकाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी 11 जणांवर भान्यास 118(1), 115(2), 189(2), 191(2), 190, 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…