Pune Crime News | पुणे: वाईन शॉपमधून दारु आणण्यास तरुणाचा नकार, मारहाण करुन कार पळवली; वडगाव शेरी भागातील घटना
पुणे : Vadgaon Sheri Pune Crime News | माझे वय कमी असल्याने वाईन शॉपमध्ये मला दारु मिळणार नाही तू दारु घेऊन ये असे तरुणाला सांगितले. मात्र, त्याने दारु आणण्यास नकार दिल्याने चार जणांनी तरुणाच्या कारचा पाठलाग करुन त्याला बेदम मारहाण केली (Marhan). त्यानंतर त्याची कार, मोबाईल, पैसे असा एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला (Robbery Case). हा प्रकार रविवारी (दि.21) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास वडगाव शेरी भागातील सोमनाथ नगर (Somnath Nagar Vadgaon Sheri) येथे घडला.
याबाबत मोक्षीत सुनिल वर्मा (वय-29 रा. साकोरे नगर, विमानगर, पुणे) याने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाळु मसु साळवे (वय-21 रा. मोझेसवाडी, वडगाव शेरी), अभीजीत जगन्नाथ संपत्ते (वय-18 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी), निखिल सुभाष दरेकर (रा. बिडीकामगार वसाहत, चंदननगर), वैभव बापू चव्हाण (रा. ग्रेवाल सोसायटी, वडगाव शेरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 126(2), 324(4), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी मोक्षीत वर्मा हा सोमनाथ नगर येथील वाईन शॉपमधून दारु घेऊन कारमधून जात होता. त्यावेळी आरोपी बाळु साळवे याने मोक्षीतला म्हणाला, माझे वय लहान आहे, एटीएम कार्ड घेऊन जाऊन वाईन शॉपमधून दारू आणून दे असे सांगितले. मात्र, मोक्षीत याने दारु आणून देण्यास नकार दिला. त्यामुळे अभीजीत आणि निखील यांनी फिर्य़ादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
मोक्षीत तिथून कारमधून निघून जात असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीवरुन कारचा पाठलाग केला.
एका स्वीट मार्ट समोर मोक्षीत याच्या कारवर दगड मारुन काच फोडली. तसेच कारसमोर दुचाकी आडवी लावून कार अडवली.
आरोपींनी मोक्षीत याच्या डोळ्यावर दगड मारुन जखमी केले.
तसेच कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर आरोपी वैभव चव्हाण याने फिर्यादी यांची कार,
मोबाईल व पैसे असा एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या