Pune Crime News | पुणे: दारुसाठी तरुणाला लुटले, कोयता व पालघन उगारून माजवली दहशत; गुलटेकडी परिसरातील घटना

marhan

पुणे : Gultekdi Pune Crime News | दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला कोयत्याचा धाक (Koyta Attack) दाखवून जबरदस्तीने 14 हजार 500 रुपये काढून घेत लुटले (Robbery Case). तसेच तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या नागरिकांवर कोयता व पालघन उगारून दहशत माजवली. हा प्रकार 13 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत (Minatai Thakre Vasahat) घडला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भिमराव नरसप्पा मानपाडे (वय-23 रा. साईनाथ सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) याने रविवारी (दि. 21) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमन शाकीर शेख (वय-19 रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) व त्याच्या साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 115 (2), 352, 351 (2), 3 (5) आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमन शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी जाण्यासाठी मिनाताई ठाकरे वसाहतीच्या कमानीतून जात होते. एक दिल मित्र मंडळाजवळ फिर्यादीच्या ओळखीची आरोपी अमन शेख याने त्यांना थांबवले. त्याने फिर्य़ादी यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी त्याला समजावून सांगत असताना अमन याने त्याच्याकडे असलेला कोयता व साथीदाराने पालघन काढून फिर्य़ादी यांना धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करुन मारहाण केली. अमन शेख याने फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने 14 हजार 500 रुपये काढून घेतले.

फिर्य़ादी यांनी आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार फिर्य़ादी मोबाईलमध्ये चित्रीत करत असताना शेख याने मोबाईलवर कोयता मारुन नुकसान केले.
फिर्यादी यांनी आरडा ओरडा केला असता परिसरातील नागिरक फिर्यादी यांच्या मदतीसाठी आले.
त्यावेळी आरोपींनी हातातील कोयता व पालघन नागरिकांवर उगारून धमकी देऊन परिसरात दहशत माजवली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed