Pune Crime News | पुणे : गाडी पार्किंगच्या वादातून तरुणावर वार, सराईत गुन्हेगाराला अटक
पुणे : Mundhwa Pune Crime News | घरासमोर पार्क केलेली गाडी काढण्यावरुन झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने (Criminal On Police Record) तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाच्या भावाला देखील इतर सथीदारांच्या मदतीने दगडाने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.16) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विकासनगर येथे घडला.
याबाबत अविनाश बाबुराव निकाळजे (वय-53 रा. टाटा बिल्डींग, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार जॉनी उर्फ रेमो लुईस अॅन्थोनी (वय-25 रा. विकासनगर मुंढवा) याला अटक केली आहे. तर त्याच्या तीन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेमो अॅन्थोनी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा पुतण्या विशाल हा घरी असताना परिसरात राहणारा रेमे याने घरासमोर गाडी पार्क केली. ती गाडी काढण्यावरुन विशाल आणि आरोपीमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने विशालच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन जखमी करुन रेल्वे पटरीच्या बाजूने पळून गेला. जखमी विशाल याला फिर्यादी यांचा पुतण्या राहुल याने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्य़ादी यांचा मुलगा सुरज याला समजला.
त्याने रेल्वे पटरकीकडे जाऊन आरोपी रेमो याला तु माझ्या भावाला का मारले अशी विचारणा केली.
याचा राग आल्याने रेमो आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी सुरज याला काठी व दगडाने डोक्यात मारहाण करुन जखमी केली.
पोलिसांनी आरोपी रेमो अॅन्थोनी याचा शोध घेऊन अटक केली.
तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…