Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृहाचे सेवानिवृत्त कार्याध्यक्ष रामचंद्र शेटे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल ! बनावट कौन्सिलची सभा दाखवून त्याच्या इतिवृत्ताद्वारे घेतला संस्थेचा ताबा

पुणे : Pune Crime News | नाशिक येथील तळेगाव अंजनेरी येथे कौन्सिलची सभा झाल्याचे दाखवून तिचे बनावट इतिवृत्त तयार करुन तिच्या संदर्भात नेमणुकीबाबत खोटे व बनावट बदल करुन घेतल्याप्रकरणी सेवानिवृत्त कार्याध्यक्षांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त रामचंद्र लक्ष्मण शेटे Ramchandra Laxman Shete (वय ७४, रा. चिंतामणीनगर, बिबवेवाडी) आणि वरुण संजय दिवाडकर Varun Sanjay Diwadkar (वय ३२, रा. नारायण पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजेंद्र विठ्ठल बोर्हाडे (वय ५५, रा. बेस्ट राजदुत सोसायटी, घाटकोपर पूर्व, मुंबई) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार धर्मादाय उपायुक्त कार्यालय व पुणे विद्यार्थी गृह (Pune Vidyarthi Griha) येथे ७ डिसेंबर २०२३ रोजी घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यार्थी गृह या संस्थेचे सेवानिवृत्त कार्याध्यक्ष रामचंद्र शेटे यांनी नाशिकमधील तळेगाव अंजनेरी येथे कौन्सिलची सभा झाल्याचे दाखविले. तिचे बनावट इतिवृत्त तयार केले. तिच्या संदर्भात वरुण दिवाडकर यांनी पुणे विद्यार्थी मंडळ यांचे नेमणुकीबाबत खोटे व बनावट १५ बदल अर्ज तसेच संस्थेच्या नियमातील व घटनेतील बदलाबाबत २ बदल अर्ज अॅड. डी़ डी़ शहा व विशाल कुंभारकर यांच्या मार्फत धर्मादाय उपायुक्त कार्यालयात दाखल केले.
या अर्ज बदलामार्फत पुणे विद्यार्थी गृह संस्थेची गैरमार्गाने ताबा घेऊन आर्थिक लाथ मिळविण्यासाठी फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू