Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | नातेवाईकाशी शाब्दिक वादावादी सुरु असताना तरुणाने त्याबाबत विचारल्याने दोघा भावांनी कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात गेल्या ३ महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल बाळासाहेब कांबळे Vishal Balasaheb Kamble (वय २७, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
या घटनेत अविनाश महादेव घोडके (वय ३९, रा. शंकर महााज वसाहत, धनकवडी) हे गंभीर जखमी झाले होते. त्याचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांच्याबरोबर विकी कांबळे हा २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता वादावादी करत होता. अविनाश घोडके यांनी कारण विचारल्यावर त्याने हा दुपारपासून माझ्याकडे का बघतो, असे सांगितले. त्यावरुन त्याने अविनाश घोडके यांच्याशी वाद घातला. विकीला त्याची आई घेऊन गेली. थोडा वेळाने विकी व त्याचा भाऊ विशाल कांबळे हे दोघे आले. त्यांनी कोयत्याने अविनाश कांबळे यांच्या डोक्यावर, कानावर वार करुन गंभीर जखमी केले होते. सहकानगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन विकी कांबळे याला अटक केली होती. तेव्हापासून विशाल कांबळे हा फरार होता.
पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिमान बागलाने यांना ७ फेब्रुवारी रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विशाल कांबळे हा लोहगाव येथे रहात आहे. बातमीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा टाकून विशाल कांबळे याला अटक केली.
विशाल कांबळे याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहायक पोलीस उप निरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, बजरंग पवार, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी, योगेश ढोले यांनी केली आहे.
