Pune Crime News | शाळेत येणार्या जाणार्या अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन वाईट इशारे करणार्या सलून कारागिराच्या समर्थ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | शाळेतून येणार्या, जाणार्या अल्पवयीन मुलींकडे पाहून वाईट इशारे करणारा तसेच त्यांचा पाठलाग करुन मोबाईल नंबर मागून त्यांचा विनयभंग करणार्या टोळभैरव सलून कारागिराच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
आयान जानमहंमद शेख Ayan Janmohammad Shaikh (वय २३, रा. नरपतगिरी चौक, मंगळवार पेठ) असे या टोळभैरवाचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने समर्थ पोलिसांनी फिर्याद दिली आहे. आयान शेख हा एका सलुनमध्ये कारागीर म्हणून काम करतो. १३ डिसेंबर पासून तो फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रिण या शाळेत जात असताना व शाळेतून घरी परत येत असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडे पाहून वाईट वाईट इशारे करत होता. २० डिसेंबर रोजी त्या दोघी शाळेतून घरी येत असताना त्यांच्याकडे पाहून हाताने इशारा करुन त्यांचा मोबाईल नंबर त्याने मागून त्यांचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यांनी समर्थ पोलिसांकडे याची तक्रार केली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने या टोळभैरवाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
