Pune Crime News | दुचाकी चोरट्यांना जेरबंद करुन समर्थ पोलिसांनी दोन दुचाकी केल्या जप्त; सीसीटीव्ही फुटेजवरुन काढला माग

Marhan1

पुणे : Pune Crime News | रास्ता पेठ आणि नाना पेठेत पार्क केलेल्या दुचाकी चोरीचा सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने माग काढून समर्थ पोलिसांनी दोघा चोरट्यांना जेरबंद केले़ त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

सागर वसंत शिंदे (वय ३०, रा. सुतार वाडी गावठाण) आणि सुबोजित राजेंद्र दास (वय २८, रा. राजेवाडी, भवानी पेठ, मुळ रा. कोलु भागर, भद्रेश्वर जि. हुगळी, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रास्ता पेठेतील के के मोटर्स या पावर हाऊस चौकात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली होती. दुचाकी चोरट्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे यांनी घटनास्थळ तसेच आजु बाजचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याचे विश्लेषण केले. तसेच गोपनीय बातमीदार यांच्या कडून माहिती मिळविली. त्यावरुन चोरट्याचा मागोवा घेत पोलीस सुतारवाडीत पोहचले. तेथून सागर शिंदे याला ताब्यात घेतले.

तसेच नाना पेठेतील इनामदार चौक येथून दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. तिचा शोध घेऊन पोलिसांनी सुबोजित दास याला पकडले़ दोघांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार अचारे, पागार, पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

You may have missed