Pune Crime News | सराईत चोरट्याकडून समर्थ पोलिसांनी जप्त केल्या 2 दुचाकी आणि लॅपटॉप (Video)
पुणे : Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने चोरट्यांचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरुन समर्थ पोलिसांनी (Samarth Police) एका सराईत चोरट्याला (Criminal On Police Record) येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले (Yerawada Jail). त्याच्याकडून २ दुचाकी व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. (Vehicle Theft Detection)
https://www.instagram.com/p/DCefeSSJe-I
राकेश जॉनी सकट Rakesh Jony Sakat (वय २४, रा. शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ (Mangalwar Peth Pune), सध्या रा. ताडीवाला रोड Tadiwala Road Pune) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. (Arrest In Vehicle Theft Case)
चोरीच्या वाहनांचा शोध घेत असताना सहायक फौजदार संतोष पागार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा राकेश सकट याने दुचाकी चोरी केली आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी येरवडा कारागृहातून राकेश सकट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने समर्थ पोलीस ठाण्याच्या परिसरातून २ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून २ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. सकट याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चोरीचा लॅपटॉप मिळाला (Laptop Theft Case). हा त्याने दत्तवाडी परिसरातून (Dattawadi) चोरल्याचे सांगितले. समर्थ पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे दोन गुन्हे व पर्वती पोलीस ठाण्याच्याकडील एक गुन्हा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार (ACP Nutan Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते (Sr PI Umesh Gite) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे (PSI Jalindar Phadtare), सहायक फौजदार संतोष पागार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रोहिदास वाघेरे, रवींद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, बोराडे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’