Pune Crime News | पीजी मध्ये राहणार्या तरुणीला जादा चढल्याचे पाहून मालकाने गैरफायदा घेण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी विनयभंगाचा केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | मित्र, मैत्रिणी यांनी मिळून जोरदार पार्टी केली. दारु जास्त झाल्याने तिला चालता येत नव्हते. त्यामुळे तिच्या मित्रांनी तिच्या होस्टेलच्या पायर्यावरच आणून सोडले. दारु जादा चढलेल्या अवस्थेतील तरुणीला पाहून पीजी मालकाच्या मनातील सैतान जागा झाला. त्याने या तरुणीशी अभद्र वर्तन करुन विनयभंग केला.
याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिरुमला ऊर्फ रघुराव तिरुम लाय्या कोथा Tirumala alias Raghurao Tirum Laya Kotha (वय ३५, रा. बालाजीनगर, घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता बालाजीनगर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका ठिकाणी नोकरीला असून बालाजीनगर येथील पीजी मध्ये रहाते. फिर्यादी व तिचे मैत्रिण व आरोपी हे सर्व जण दारु पित होते. फिर्यादीला खूप जास्त दारु पिल्यामुळे चालता येत नव्हते. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला घरी घेऊन गेले. परंतु, त्यांनी तिला रुममध्ये न नेता पायर्यावरच ठेवले. ही तरुणी पायर्यावर बसून राहिली होती. हे पाहून तिरुमला कोथ्या याने पाठीमागून येऊन तिला मिठ्ठी मारली. तिच्याबरोबर अभद्र वर्तन करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत.
