Pune Crime News | व्याजाने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकाविल्याने ज्येष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या, दोघांना अटक

susaide (2)

पुणे : Pune Crime News | कामासाठी व्याजाने उसने पैसे दिले असताना ते परत मागितल्याने दमदाटी करुन धमकाविल्याने एका ज्येष्ठाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उदय सुभाष तेलंग (रा. विनायकनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत उदय तेलंग यांची पत्नी (वय ५०, रा. विनायक नगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल नारायण कोंडल (वय ५४, रा. गणेशनगर, सांगवी) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती उदय सुभाष तेलंग यांच्याकडून ऑगस्ट २०१६ मध्ये सुनिल कोंडल याने १० लाख रुपये उसने घेतले होते. त्या बदल्यात दरमहा ३ टक्के दराने व्याज परत देण्याचे स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून दिले होते. तसेच सहा महिने अगोदर सांगितल्यानंतर दिलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यानंतर त्याने १२ महिने घेतलेल्या रक्कमेचे व्याज दरमहा ३० हजार रुपये याप्रमाणे परतावा परत केला. त्यानंतर व्याज व मुद्दल असे दोन्ही रक्कमा परत न करता फिर्यादी व त्यांचे पती तेलंग यांची फसवणुक केली. त्यानंतर पैसे मागितल्यानंतर त्यांना दमदाटी करुन धमकावले. त्यामुळे घाबरुन उदय तेलंग यांनी ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.