Pune Crime News | धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलीने घरातच बाळाला जन्म देऊन स्वत:च कापली नाळ

Pune Crime News | Shocking! 15-year-old girl gives birth to baby at home and cuts umbilical cord herself

पुणे : Pune Crime News | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरामध्ये एका बाळाला जन्म देऊन स्वत:च तिची नाळ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या मुलीवर व तिच्या बाळावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबत या मुलीच्या बहिणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदिल फारुख शेख (वय २४, रा. गोल्डग सिटी बिल्डिंग,  न्यू नाना पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा विवाह झाला असून त्या ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता माहेरी आईकडे आल्या होत्या. तेव्हा घर आतून बंद होते. तिचा भाऊ आल्यावर त्याने आवाज दिल्यावर तिच्या लहान बहिणीने दरवाजा उघडला. ते दोघे घरात गेल्यावर त्यांना घरात फरशीवर रक्ताचे डाग पडलेले दिसले. त्यांनी घरातील देर्‍हाव्याजवळ पाहिल्यावर तेथेही रक्ताचे डाग दिसले.

खिडकीत एक बाळ ठेवलेले दिसले. त्यांनी लहान बहिणीला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने सांगितले की, तिची डिलेव्हरी झाली. बाळाची नाळ कोणी कापली असे विचारल्यावर तिनेच बाळाची नाळ कापल्याचे सांगितले. त्यांची आई व आत्या आल्यावर तिने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून आदिल शेख याच्याबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यातून आमचे दोन तीन वेळा शरीरसंबंध झाले आहेत. त्यानंतर त्यांनी या मुलीला व तिच्या बाळाला रुग्णालयात नेले असून तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके तपास करीत आहेत.

You may have missed