Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात कौटुंबिक वादातून पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

crime-logo

पुणे : Lonikand Pune Crime News | कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणीकंद भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यातील लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder In Lonikand Pune)

कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. लक्ष्मीबाई जाधवराव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी पती बाबा जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand Police Station) हद्दीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील बुर्के गावात जाधव दाम्पत्य वास्तव्यास होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. सोमवारी रात्रीही बाबा जाधव हा घरी आल्यानंतर त्याचे त्याच्या पत्नीशी वाद झाले.

वादानंतर पतीने मध्यरात्री १ वाजल्यानंतर घरातील कुऱ्हाडीने त्याच्या झोपलेल्या पत्नीवर सपासप वार केले.
या हल्ल्यात लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाई
यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य