Pune Crime News | तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करणारा शूटर जेरबंद; गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन गळ्यावर केले होते वार
पुणे : Kondhwa Pune Crime News | मोटरसायकलचा धक्का लागल्याने झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन खूनाचा प्रयत्न करुन पळून गेलेल्या सोहेल शूटर (Sohail Shooter) याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे. (Attempt To Murder)
या घटनेत अरबाज खलील शेख (वय २४, रा. नेहरु पार्क, कोंढवा खुर्द) हा तरुण जबर जखमी झाला असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. ही घटना कोंढव्यातील नावजीश चौकात (Nawazish Chowk Kondhwa) २१ जुलै रोजी रात्री आठ वाजता घडली होती. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एन पी केबल वानवडी या कंपनीमध्ये काम करतात. त्यांना सुट्टी असल्याने २१ जुलै रोजी रात्री ते हयात हॉटेलसमोर आले होते. तेथे त्यांचे नातेवाई बशीर खान, त्याचे चाचा गुलाब, चाची रेश्मा पठाण हे आले होते. चाचा व चाची यांना रिक्षात बसवून देत असताना तिघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांचा चाचीला धक्का लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले. त्यावर ते गाडी पार्क करुन फिर्यादीकडे आले. फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा सोहेल शूटर याने त्याच्याकडील कोयता बाहेर काढला. ते पाहून फिर्यादी पळून जाऊ लागले. तिघांनी त्यांचा पाठलाग करुन जलधारा बिल्डिगच्या गेटवर त्यांना पकडले. सोहेल शूटर याने कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तिघे पळून गेले.
कोंढवा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
सोहेल शूटर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
अन्य दोघांचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी