Pune Crime News | ‘पुढे साहेब आहेत, गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा’’ ! दोघा भामट्यांनी ७२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवून केली फसवणूक

Pune Crime News | ‘Sir, take off your gold jewellery’! Two crooks cheated a 72-year-old woman by promising her free jewellery

पुणे : Pune Crime News | पुढे साहेब लोक आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी करत दोघा भामट्यांनी स्वयंपाकाचे काम करणार्‍या ७२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवत १ लाख २० हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.

याबाबत एका ७२ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या खासगी पीजीमध्ये स्वयंपाकाचे काम करतात. १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्या पायी लक्ष्मी गुंज अपार्टमेंट येथून पायी काम करण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. वाटेत दोघे जण त्यांच्याजवळ आले. चंदननगर परिसरात साडी व किराणा मालाचे गरीबासाठी वाटप चालू आहे. तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला ते मिळवुन देतो, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी साडी व किराणा माल नको, असे सांगितले. परंतु, त्यानंतर त्यांना थोडा वेळ काही एक न समजता त्या इसमाच्या मागे जाऊ लागल्या.

पुढे साहेब लोक आहेत. तुमच्या कडील सोन्याच्या  वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, असे त्याने सांगितले. त्यावर या महिलेने कानातील सोन्याचे टॉप्स, वेल व गळ्यातील रामअक्षर व मणी हे काढून बॅगमध्ये ठेवत असताना त्याने त्यांच्याकडून घेऊन मी बॅगेत ठेवतो, असे म्हणाला. बॅगेत न ठेवता तो खराडी बायपास रोडकडे निघून गेला. तो तेथून पळून जात असताना काही अंतरावर उभा असलेला त्याचा साथीदारही त्याच्याबरोबर पळून गेला. त्यांनी चोर चोर असे म्हणत काही अंतर त्यांचा पाठलाग केला. पण, ते दोघे पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

You may have missed